तिवरे धरण आरसीसी बांधणार: शिवसेना खासदार विनायक राऊत
तिवरे धरण आरसीसी बांधणार, अशी ग्वाही शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आज रविवारी दिली. येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते व आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे, सभापती धनश्री शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दीप्ती महाडिक, विधानसभा प्रमुख बाळा कदम, राकेश शिंदे, सरपंच वैशाली पाचांगने यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून धरणग्रस्तांना घरे बांधून दिली जाणार आहेत. ११ कोटींचा हा प्रस्तावित प्रकल्प असून या प्रकल्पाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री विजय वडेट्टीवार यांना आणण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून या नगरीला ‘सिद्धिविनायक नगरी’ असे नाव दिले जाईल, असेही खा. विनायक राऊत असे म्हणाले.
www.konkantoday.com