सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली गावात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी ४० दिवस बंदी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी आंबोली गाव समिती व ग्रामपंचायतीने नवीन नियम ठरविले आहेत. आंबोलीत सध्या कोरोनाचे रूग्ण नसले तरी आंबोली हे कर्नाटक व गोवा राज्याला जोडणारा घाटमार्ग येथून जात असल्याने त्या ठिकाणी वाहतूक होत असते. याशिवाय सध्या कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीतही कोरोना रूग्ण वाढत आहेत. यामुळे या गावसमितीने आजपासून ७ सप्टेंबरपर्यंत म्हणजेच ४० दिवस आंबोली गावात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय व बाजारपेठ पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून या काळात गावाबाहेरील व्यक्तींना गावात येण्यास पूर्णतः मज्जाव घालण्यात आला आहे.
www.konkantoday.com