
महिला रूग्णालयात सुरू होणारे कोविड रूग्णालय आता मंगळवारी सुरू होण्याची शक्यता
रत्नागिरी शासकीय कोविड रूग्णालयात सध्या रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गेल्या आठवड्यात उद्यमनगर येथील महिला रूग्णालयात कोविड रूग्णालय सुरू करणार असल्याचे सांगितले होते. या ठिकाणी अंदाजे १०० बेड राहणार असून त्यामध्ये ऑक्सिजनची सुविधा असणारे बेडही सुरू होणार आहे. मात्र हे रूग्णालय ८ दिवसांपूर्वी सुरू होणार होते परंतु अजूनही काही कामाची पूर्तता राहिली असल्याने या रूग्णालयाचा शुभारंभ आता या मंगळवारपर्यंत होणार असल्याचे कळते.
www.konkantoday.com