
बनावट प्रवासी पास प्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक
मुंबई क्राईम ब्रँच यांनी काही दिवसांपूर्वी बनावट प्रवासी पास प्रकरणी हडी मावलण येथून तीनजणांना ताब्यात घेतले होते. बनावट पास प्रकरणी मालवण पोलिसांनी सर्फराज शेख याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. पोलीस तपासात यातील मुख्य सूत्रधार शहाबाज सलाम (रा. नालासोपारा, पालघर) हा असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर मालवण पोलीस पथकाने नालासोपारा येथील शहाबाज याला ताब्यात घेतले आहे. त्याचे नालासोपारा येथे पॅनकार्ड काढून देणे व अन्य स्टेशनरीचे दुकान आहे. त्याचा लॅपटॉप व मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
www.konkantoday.com