पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबतचा संभ्रम कायम
पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबतचा संभ्रम शुक्रवारीदेखील कायम राहिला. यासंदर्भात कोणताही अंतरिम आदेश जारी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र, या परीक्षा सप्टेंबरच्या अखेरीस घेण्यात येतील. विद्यार्थ्यांनी तयारीत राहावे. परीक्षा रद्द होणार नाहीत, अशी ठाम भूमिका विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मांडली आहे. दरम्यान, या प्रकरणावरील पुढील सुनावणी 10 ऑगस्ट रोजी होणार आहे.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कोणत्याही स्थितीत परीक्षा होतील. विद्यार्थ्यांनी त्यासाठी तयार राहावे. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्यामुळे या परीक्षांवर स्थगिती येऊ शकते, या भ्रमात कोणी राहू नये.परीक्षेशिवाय कोणालाही पदवी मिळणार नाही, असे यूजीसीच्या वतीने न्यायालयासमोर स्पष्ट करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी यूजीसीच्या वतीने ही भूमिका ठेवली
www.konkantoday.com