
तिवरे खाडीत मासे पकडण्यासाठी गेलेल्याचा बुडून मृत्यू
राजापूर-तिवरे खाडीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या पद्माकर राजाराम हळदणकर (६८) याचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. वाडातिवरे पो. राजवाडी, राजापूर येथे राहणारे पद्माकर हळदणकर हे तिवरे खाडीमध्ये मासे पकडण्यासाठी गेले होते. मासे पकडत असतानाच त्यांचा पाय जाळ्यात गुरफटला. त्यामुळे खाडीच्या ओहोटीच्या पाण्यात ते वाहून गेले व त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. याबाबत नाटे पोलीस स्थानकात याची नोंद झाली आहे.
www.konkantoday.com