
चिपळूण नॅशनालिस्ट कंझ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनच्या पदाधिकार्यांनी दिली महावितरणवर धडक
सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात सापडलेली असतानाच महावितरणने भरमसाठ वीज बिले माथी मारल्याने संतप्त ग्राहकांसह नॅशनालिस्ट कंझ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनच्या पदाधिकार्यांनी शुक्रवारी थेट महावितरण कार्यालयावर धडक दिली. आक्रमक झालेल्या महिला पदाधिकार्यांनी महावितरणच्या अधिकार्यांना निवेदन देत वाढीव वीज बीले रद्द करा, वीज कनेक्शन तोडू नका, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी २० ऑगस्टची डेडलाईन देण्यात आली असून त्यासंदर्भात लेखी उत्तर न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
www.konkantoday.com




