
मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांनी सिंधुदुर्गची वाट धरली
मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांनी सिंधुदुर्गची वाट धरली आहे. यात खारेपाटण चेकपोस्टवर नोंदणी, आरोग्य तपासणीसाठी प्रचंड गर्दी झाली आहे. चाकरमान्यांच्या वाहनांच्या रांगा दोन ते तीन किलोमीटरपर्यंत लागल्या आहेत.
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ७ऑगस्टपर्यंत गावी येण्याची अंतिम तारीख निश्चित झाली आहे. तसे ठराव देखील बहुतांश ग्रामपंचायतींनी घेतले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांची धावपळ सुरू झाली असून खासगी आराम बस तसेच इतर वाहनातून आपापल्या गावी दाखल होत आहेत. कालपासून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होऊ लागल्याने त्याचा ताण खारेपाटण चेकपोस्टवरील महसूल, आरोग्य आणि पोलिस यंत्रणेवर आला आहे.
www.konkantoday.com




