शासनाकडूनही निधीची तरतूद झाली नसल्याने सागरी महामार्गाचे भवितव्य धोक्यात
कोरोनामुळे सर्व उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. तर विकास कामांवरही कोरोनाच्या लॉकडाऊनचा परिणाम पहायला मिळत आहे. तर रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविणार्या ठेकेदाराचा ठेका समाप्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. शासनाकडूनही निधीची तरतूद झालेली नसल्याने या महामार्गाचे भवितव्य अधांतरी आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गासोबत सागरी महामार्गही होईल ही आशा आता मावळली आहे. कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सागरी महामार्ग उभारण्याला प्राधान्य दिले गेले होते.
www.konkantoday.com