राज्यात कोरोनाचे काल ८८६० रुग्ण बरे झाले
राज्यात कोरोनाचे काल ८८६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४८ हजार ६१५ झाली आहे. मात्र परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. कालपर्यंत १० हजाराच्या आत असणाऱ्या कोरोना रुग्णांनी गुरूवारी १० हजाराचा टप्पा ओलंडला आहे. काल११,१४७ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४८ हजार १५० रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.३७ टक्के आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
www.konkantoday.com