
आयटीआयमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १ ऑगस्टपासून प्रवेश अर्ज भरता येणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात झाली आहे. आयटीआय प्रवेशाची तारीख देखील जाहीर करण्यात आलीय. आयटीआयमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १ ऑगस्टपासून प्रवेश अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी यासंदर्भात माहिती दिली.
दरम्यान दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण इच्छूक विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेत आयटीआयसाठी अर्ज करावा असे आवाहन राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटले. प्रत्येक युवकास कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर रोजगार देण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
www.konkantoday.com