
शाळा सुरू झाल्या तरी शाळा इमारतीच्या दुरूस्तीची प्रतीक्षा कायम.
नव्या शैक्षणिक वर्षापूर्वीच पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घालून जिल्हा नियोजनामधून सन २०२४-२५ या वर्षात शाळा दुरूस्तीसाठी ३ कोटी ६३ लाख रुपये मंजूर केले होते. आता तर या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला असताना जिल्हा वार्षिक योजनेतून प्राथमिक शाळांच्या विशेष दुरूस्तींतर्गत कार्यारंभ आदेश दिलेल्या २०६ शाळांच्या कामांपैकी १३० कामे पूर्ण झालीत त्यातील अजूनही ४५ शाळांची कामे प्रगतशील तर ३१ शाळांची कामे सुरू होण्याची प्रतीक्षा राहिली आहे.जिल्हा परिषदेच्या काही प्राथमिक शाळा आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत डिजिटल झाल्या असल्या तरी काही शाळांच्या दुरुस्तीचा प्रश्न उभा आहे. मागील काही महिन्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील २११ प्राथमिक शाळांच्या दुरूस्तीची कामे जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ मध्ये मंजूर झाली होती. त्या कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली होती. प्राथमिक शाळांच्या इमारती नादुरूस्त बनल्याने नव्या शैक्षणिक वर्षात शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्या शाळांची दुरूस्तीची कार्यवाही सुरू करण्यात आली. त्या धोकादायक शाळांच्या दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून सुमारे साडेतीन कोटी मंजूर करण्यात आले होते.नव्या शैक्षणिक वर्षापूर्वीच त्या शाळा दुरूस्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.www.konkantoday.com