तोपर्यंत रिफायनरीचा पुनर्विचार होणार नाही- खा. विनायक राऊत
स्थानिक नागरिक अद्यापही रिफायनरीच्या विरोधात आहेत, ते जोपर्यंत रिफायनरीची मागणी करीत नाहीत. तोपर्यंत रिफायनरीचा पुनर्विचार होणार नाही, अशी भूमिका खा. विनायक राऊत यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे केंद्राकडून रिफायनरीला अल्टिमेटम नसल्याचेही खा. राऊत यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी दौर्यावर आलेल्या खा. विनायक राऊत यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी चर्चा केली. शिवसेना नेहमीच स्थानिक लोकांसोबत राहिली आहे. नाणार परिसरात किती परप्रांतीय लोकांनी रिफायनरी होणार, या उद्देशाने जागा घेतली आहे. या परप्रांतीय भू माफियांची दलाली ज्यांनी केली आहे.त्यांना आता रिफायनरी हवी आहे. सध्या हिच मंडळी रिफायनरीची बाजू लावून धरीत
आहेत. स्थानिक भूमिपुत्रांनी रिफायनरीची मागणी केल्यास महाराष्ट्र शासन त्याचा नक्की विचार करील असे खा. राऊत यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com