
दोन महिन्यांपूर्वी केलेला खड्डयांचा मेकअप पहिल्याच पावसात धुपून गेला
रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गावरील तीन महिन्यांपूर्वी भरलेले खड्डे पहिल्याच पावसात उखडले आहेत. त्यामुळे दाभोळे, मेढे, कोंडगाव, साखरपा, आंबा घाट परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून पहिल्याच पावसात आत्ताच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. परिणामी वाहनचालक कमालीचे त्रस्त झाले आहेत .
अजून पावसाचे तीन महिने बाकी आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात खड्डे भरले जातात आणि पावसाळ्यात हे खड्डे उखडतात. म्हणजे येरे माझ्या मागल्या असाच काहीसा प्रकार सुरु आहे. त्यामुळे उन्हाळी भरलेल्या खड्यांचा पावसाळ्यात सुरक्षित प्रवासासाठी काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे खड्डे चुकविताना अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या असून कामाचा दर्जा घसरला असल्याची भावना व्यक्त होत आहे
www.konkantoday.com