वीज बिल सूट देण्याबाबत राज्य सरकार MERC ला प्रस्ताव देणार
राज्यभरात अनेकांना वाढीव वीज बिलाचा फटका बसलाय. यामुळे जनतेत आक्रोश आहे. यासंदर्भात राज्य सरकारची वीज नियामक मंडळासोबत बैठक होत असून यातून ग्राहकांना २० ते ३० टक्के सूट मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय.
राज्यात एकूण 73 लाख घरगुती वीज ग्राहक आहेत. ९३ टक्के वीज ग्राहकांना वीज बिल सूट दिल्यानंतर फायदा होणार आहे. वीज बिल सूट देण्यासाठी जानेवारी ते मार्च मधील वीज युनिटचा विचार केला जाणार आहे. वीज बिल सूट देण्याबाबत राज्य सरकार MERC ला प्रस्ताव देणार आहे. MERC ने प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव येणार आहे.वाढीव वीज बिलांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक पार पडली. या बैठकीला ऊर्जामंत्री नितीन राऊत, अनिल परब उपस्थित होते
www.konkantoday.com