रिफायनरीबाबत मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासक वक्तव्याने कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या समर्थक पदाधिकार्‍यांना ऊर्जा

कोरोनासारख्या जागतिक महामारीने कोकणला घट्ट विळखा घातलेला असतानाच प्रचंड बेरोजगारीची कुर्‍हाड राज्यावरच कोसळली आहे. या पार्श्‍वभूमीवर अखंड कोकणातील जनता रिफानरी प्रकल्पाकडे आशेने नजर लावून बसलेली आहे. या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या मुखपत्रात दिलेल्या मुलाखतीत रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून त्याबद्दल रिफायनरी समर्थक असलेल्या बलाढ्य कोकण जनकल्याण प्रतिष्ठान या संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर, प्रवक्ते अविनाश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासक वक्तव्याने अनेक महिने धडपड करणार्‍या या पदाधिकार्‍यांना नवी उर्जा मिळणार आहे.
दरम्यान प्रतिष्ठानच्यावतीने मुख्यमंत्री ठाकरे यांना आवाहन करण्यात आले असून कोकणातील जनतेला बेरोजगारीच्या विळख्यातून बाहेर काढून समृद्धीची पहाट दाखविण्यासाठी लवकरात लवकर रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना जारी करावी अशी विनंती करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button