मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर नजीक कोंड्ये येथे अवैध मद्य वाहतूकीवर कारवाई केल्याने गोळीबार


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने राजापूर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील कोंड्ये येथे सापळा रचून दारू वाहतूक करणारा ट्रक पकडला. यावेळी मागून दोन वाहनातून आलेल्या दहा जणांच्या टोळक्याने पोलिसांनी ट्रक सोडण्यासाठी दोन वेळा हवेत गोळीबार केला.त्यानंतर ट्रक चालकाला घेवून पलायन केल्याची थरारक घटना मंगळवारी (दि.५) मध्यरात्री घडली. ट्रकचा चालक व गोळीबार करणारे सोलापूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित चालक व त्याचा एक साथीदार याला बांदा चेकपोस्ट येथे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक सतिश इंगले यांनी राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबई येथील भरारी पथकाने कोंड्ये येथे अवैधरित्या होणारी दारू वाहतूक रोखण्यासाठी सापळा लावला होता. मंगळवारी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास संशयित वाहन (एमएच ४६ एएफ ६१८३ ) समोरून येताना दिसल्याने पोलिसांनी थांबविले. यावेळी वाहन चालक महावीर भोसले व त्याच्यासोबत ज्ञानेश्वर उन्हाळे (रा. पोखरापूर, ता.मोहोळ, जि.सोलापूर) या दोघांची पोलिसांनी चौकशी केली असता गोव्यावरून अवैध मद्यसाठा भरून सोलापूरला घेवून जाणार असल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली.
दरम्यान या वाहनाची चौकशी सुरू असताना १० मिनिटानंतर गोव्याकडून अचानकपणे (एमएच १४ जेए ४१५५ ) आणि (एमएच ९०९० ) अशा दोन कार येवून थांबल्या. या गाड्यांमधून ८ जणांचे टोळके खाली उतरले. यापैकी सोमनाथ उर्फ प्रशांत उर्फ बापू तुकाराम भोसले (रा. खवणी, ता. मोहोळ, जि.सोलापूर) तर दुसरा त्याचा चुलत भाऊ शेखर भोसले होता. बापू भोसले व त्याच्या साथीदारांवर या आधी राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये १० पेक्षा जास्त गुन्हे नोंद आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button