राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री हे सर्वजण आपल्या पसंतीनुसार वाहन खरेदी करु शकणार
राज्यपालांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री हे सर्वजण आपल्या पसंतीनुसार वाहन खरेदी करु शकणार आहेत. राज्य सरकारने यासंदर्भात शासन निर्णय आणला आहे. शासनाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या दर्जानुसार शासकीय वाहन खरेदीबाबत संभ्रम निर्माण होत होतं. या पार्श्वभुमीवर हा निर्णय जाहीर करण्यात आलायं.
राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उच्च न्यायालय मुख्य न्यायमुर्तींना वाहन त्यांच्या पसंतीनुसार खरेदी करता येणार आहे. यासाठी किंमत मर्यादा नसेल
www.konkantoday.com