गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय मल्हार महोत्सवचा निकाल जाहिर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी यांनी मल्हार महोत्सव 2020 हा राज्यस्तरीय संस्कृतिक महोत्सव आयोजित केला होता. हा महोत्सव ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आला होता.या महोत्सवामध्ये 115 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला.यामध्ये कथाकथन स्पर्धा ,एकेरी गायन स्पर्धा ,एकेरी नृत्य स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा अशा विविध स्पर्धांचा यामध्ये समावेश होता.अशाप्रकारे राज्यस्तरीय महोत्सव घेऊन उदंड प्रतिसाद मिळणारे गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी हे महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय आहे. महोत्सव यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व प्राध्यापक मित्रांनी बहुमोल सहकार्य केले. हा मल्हार महोत्सव म्हणजे कोरोना महामारीच्या भयावह स्थिती विद्यार्थी कलाकार आणि रसिकांना आनंद यात्राच होती. एकेरी नृत्य स्पर्धेमध्ये श्रेया म्हात्रे( जी एस एम कॉलेज अलिबाग-रायगड) यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. या स्पर्धेचे परीक्षण रुपा वसावे -मुंबई ,मानसी भिडे -सोमन गुहागर, प्रज्ञा देव पवार पुणे यांनी परीक्षण केले. एकेरी गायन स्पर्धेमध्ये सुलोचना अनील प्रभू (अठले सप्रे पित्रे कॉलेज देवरुख रत्नागिरी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला या स्पर्धेचे परीक्षण श्री विवेक वाडीये रत्नागिरी ,श्री सुमित चाचे मुंबई ,ओंकार बंडबे रत्नागिरी, सौ पूजा देसाई -चाफळकर सांगली यांनी केले. कथाकथन स्पर्धेमध्ये ऋतुजा रत्नहार पाटील( कमला कॉलेज कोल्हापूर) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.या स्पर्धेचे परीक्षण सौ मंजिरी पटवर्धन-तापस मुंबई ,ज्योती मुळे रत्नागिरी, कुमारी सायली सुर्वे मुंबई यांनी केले.एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये साक्षी मनोज मंचेकर (सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज ठाणे मुंबई) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.या स्पर्धेचे परीक्षण योगेश कुंभार मुंबई, महेश कापेरकर मुंबई, सागर चव्हाण मुंबई यांनी केले.या महोत्सवाला सहाय्य प्रा.शुभम पांचाळ, संस्कृती विभाग प्रमुख प्राध्यापक आनंद आंबेकर तसेच विशेष सहकार्य प्राचार्य डॉक्टर किशोर सुखटणकर यांचे लाभले.
www.konkantoday.com