गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांची खारेपाटण चेकपोस्ट येथे रॅपिड टेस्ट होणार
मुंबई-पुणे तसेच राज्यांतून चाकरमानी सिंधुदुर्गात गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण चेकपोस्ट येथे जिल्ह्यात प्रवेश करणार्या प्रत्येक प्रवाशाची रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहे. यासाठी उभारण्यात येणार्या तपासणी लॅबच्या जागेची पाहणी कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी मंगळवारी केली. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे गावी येणारे चाकरमानी व स्थानिक नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती व संभ्रम दूर होणार आहे.
www.konkantoday.com