कोकण म्हणजेच शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच कोकण हे समीकरण पुन्हा दिसेल-अॅड. अनिल परब
कोकणातल्या चाकरमान्यांना गणपतीला गावी सुखरुप पाठवणे, त्याचवेळी स्थानिक कोकणी माणसाची कोरोना संसर्गापासून काळजी घेणे ही सरकारची आणि शिवसेनेची कर्तव्ये आहेत आणि आम्ही ती चोख बजावणार, असा आत्मविश्वास राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे विभागप्रमुख अॅड. अनिल परब यांनी व्यक्त केला.
गेले काही दिवस कोरोनामुळे परप्रांतिय सरकारी खर्चाने त्यांच्या राज्यात सोडणारे राज्य प्रशासन कोकणातील चाकरमान्यांना रत्नागिरी, सिंधुदुर्गात जाण्यास आडकाठी करत आहे. मुंबई-पुणेकरांमुळे आपल्याला संसर्ग होईल अशी भीती कोकणी माणसाला वाटते आहे. त्यामुळे कुणाची मागणी पूर्ण करायची या कोंडीत सरकार आणि शिवसेना सापडली आहे.परब म्हणाले की, कोकणी माणूस आणि शिवसेना यांचे अतूट नाते आहे.
ते कुणाला नव्याने दाखवून द्यायचे नाही. आम्ही लॉकडाऊनमध्ये चाकरमान्यांना गावी पाठवण्याच्या प्रयत्नात असताना तिथल्या स्थानिक कोकणी माणसांनी त्याला विरोध केला. आता मात्र दोघांनाही समजावून, समन्वय साधून चाकरमान्यांना कोकणात पाठवण्यासाठी आणि तिथल्या मंडळींनाही सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रासंगिक नेत्यांनी कोकणी, चाकरमान्यांच्या नाराजीने हुरळून जायची काहीच गरज नाही. मी तर म्हणतो कोकण म्हणजेच शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच कोकण हे समीकरण पुन्हा दिसेल.
www.konkantoday.com