आरोग्य विज्ञान विद्यापीठाने समविचारी मंचची मागणी मान्य केली.
रत्नागिरीः (प्रतिनिधी)
राज्यातील बीएएमएस,युनानी, या वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांची त्या त्या जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रशिक्षण घेऊन सहा महिने कालावधीचा आधुनिक मध्यमस्तरीय सेवाप्रदाता प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू आहे.
हे प्रशिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांची परीक्षा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या मार्फत घेतली जाते.सदरील परीक्षेसाठी या विद्यापीठाने १५ हजार ९२० रुपये परीक्षा शुल्क आकारले होते.ही परीक्षा फी आजच्या कोरोना काळात भरमसाठ असून परिक्षार्थीना असह्य आहे.म्हणून त्यात सर्वसामान्य उमेदवारांना परवडेल अशी कपात करावी अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचचे प्रमुख बाबासाहेब ढोल्ये,महासचिव श्रीनिवास दळवी,युवा प्रमुख निलेश आखाडे,प्रांतिक सदस्य अनुप हल्याळकर,राधिका जोगळेकर,जान्हवी कुलकर्णी आदींनी परीक्षा नियंत्रक सह अन्य सबंधितांकडे केली होती.
या विनंतीला मान देऊन आता हे शुल्क ५ हजार ५०० रुपये करण्यात आले आहे.या निर्णयामुळे राज्यातील ३ हजार उमेदवारांना याचा फायदा झाला आहे.यामुळे संबंधित उमेदवारांमध्ये आनंद निर्माण झाला असून अनेक परीक्षार्थींनी समविचारीचे आभार मानले आहे.या पाश्वभूमीवर समविचारी मंचने आरोग्य विद्यापीठाला धन्यवाद दिले असून कृतज्ञता व्यक्त केली आहे.
www.konkanroday.com