स्वॅब यंत्रणेवरील ताणामुळे अहवाल मिळण्यास उशिर?
कोरोना संशयित काेराेना रुग्णांचे अहवाल त्वरित मिळावे यासाठी रत्नागिरीत कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आली आहे ही लॅब झाल्याने एका दिवसात अहवाल मिळतील अशी अपेक्षा होती सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण मिळण्याचे प्रमाण वाढले असल्याने या स्वॅब तपासणी यंत्रणेवर ताण वाढला आहे त्यातच या यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांना काेरानाची लागण झाली असल्याने स्वाॅब तपासणीसाठी यंत्रणेवरील ताण आणखी वाढला असल्याने अजूनही अनेक स्वॅब पेंडिंग असल्याचे कळत आहे स्वॅब देऊनही अहवाल न आल्याने अनेकजण दडपणाखाली आहेत चार दिवस होऊनही स्वॅबचा अहवाल येत नसल्याची एकाने तक्रार केली आहे
www.konkantoday.com