शिवसेनेसोबत राज्याच्या हितासाठी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास आपण तयार-चंद्रकांत पाटील
शिवसेनेसोबत राज्याच्या हितासाठी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास आपण तयार असून पण शिवसेना आणि भाजप एकत्र आले तरी निवडणूका मात्र आम्ही वेगवेगळ्या लढू, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडली नाही.
सध्या शिवसेना खूप हवेत असून त्यांना स्वर्गाला बोटे टेकल्यासारखे वाटत असल्याची टीका त्यांनी केली असून ते ऐकतील असे वाटत नसल्याचेही म्हटले आहे.
www.konkantoday.com