रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात 43 नवे रुग्ण, एकूण पॉझिटिव्ह 1661,एकूण बरे झाले 1102 , 4 रुग्णांचा मृत्यु
रत्नागिरी दि. २८ (जिमाका): गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 43 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1661 झाली आहे. दरम्यान 48 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1102 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय 3, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली 3, उपजिल्हा रुग्णालय कामथे 3, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 7, कोव्हीड केअर सेंटर घरडा, खेड 19, आणि 13 कोव्हीड केअर सेंटर पेंढांबे, चिपळूण मधील आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण खालील प्रमाणे
जिल्हा कोव्हीड रुग्णालय, रत्नागिरी – 16 रुग्ण
उपजिल्हा रुग्णालय, कामथे – २० रुग्ण
कळबणी, खेड – २ रुग्ण
गुहागर – ५ रुग्ण
मुरडव, संगमेश्वर येथील एका 45 वर्षीय रुग्णाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. सदर रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पेठकिल्ला, रत्नागिरी येथील 40 वर्षीय कोरोना रुग्ण तसेच मिरकरवाडा, रत्नागिरी येथील 40 वर्षीय महिला कोरोना रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच कालुस्ते, चिपळूण येथील 80 वर्षीय कोरोना उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता 57 झाली आहे. तालुकानिहाय मृतांचा आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे .
रत्नागिरी – 14
खेड – 6
गुहागर – 2
दापोली – 11
चिपळूण – 10
संगमेश्वर – 7
लांजा – 2
राजापूर – 4
मंडणगड – 1
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 1661
बरे झालेले – 1102
मृत्यू – 57
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 502
ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन (२७ जुलै २०२० पर्यंत )
जिल्ह्यात सध्या 198 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 25 गावांमध्ये, दापोली मध्ये 11 गावांमध्ये, खेड मध्ये 60 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 7, चिपळूण तालुक्यात 82 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 1 , गुहागर तालुक्यात 10 आणि राजापूर तालुक्यात 2 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरण
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 61, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 12, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे 2, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -6, कोव्हीड केअर सेंटर घरडा – 2, ग्रामीण रुग्णालय गुहागर – 1, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – 20, कोव्हीड केअर सेंटर लांजा – 1 असे एकूण 105 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
होम क्वॉरंटाईन
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 21 हजार 008 इतकी आहे.
14 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 16 हजार 815 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 16 हजार 399 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1661 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 14 हजार 726 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 416 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 416 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत. यामध्ये घरडा केमिकल्सच्या खाजगी लॅबचे आकडे समाविष्ठ नाहीत.
परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 27 जुलै 2020 अखेर एकूण 2 लाख 16 हजार 897 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 1 लाख 5 हजार 079 आहे.
होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सदरची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हीड-19 कक्षाकडून प्राप्त झाली आहे.
www.konkantoday.com