
दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या बुधवार २९ जुलै रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार
मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. हा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर केला जात असल्याचे कळवण्यात आले आहे.
मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, लातूर, नाशिक, कोल्हापूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या अधिकृत संकेतस्थळावर उद्या बुधवार २९ जुलै रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.
www.konkantoday.com