
ठेकेदार भर पावसात डांबराने खड्डे भरत असल्याने आश्चर्य
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाची डागडुजी करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. त्यानुसार चिपळुणातील महामार्गाचे खड्डे बुजविण्यास संबंधित ठेकेदाराने सुरूवात केली आहे. मात्र भर पावसात डांबराने हे खड्डे बुजविले जात असल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आतापर्यंत तीन ते चार वेळा हे खड्डे बुजविण्यात आले आहेत.
www.konkantoday.com