
खाडीत उभ्या केलेल्या बोटीतून पडून खलाशाचा मृत्यू
नारायण काशीनाथ भुवड या खलाशाचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना साखरतर येथे घडली.
साखरतर येथील जहांगीर मुल्ला यांच्या बोटीवर नारायण भुवड हा खलाशी म्हणून काम करीत होता. खाडी किनारी असलेल्या बोटीवरच त्याची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.तेथे तो राहात होता. परंतु सायंकाळी त्याचा मृतदेह खाडीच्या पाण्यात तरंगतांना आढळून आला. याबाबत पोलीस स्थानकात फिर्याद देण्यात आली आहे.
www.konkantoday.com