
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये निकृष्ट पोषण आहार, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा हात -माजी खासदार निलेश राणेचा आराेप
रत्नागिरी आणि चिपळूण मधील पोषण आहार पुरवठादार गोदामातून बुरशी लागलेले धान्य पुरवठा होत होते. यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा हात असून लवकरच नावासकट हे प्रकरण बाहेर काढणार असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये निकृष्ट पोषण आहार पुरवठादारांकडून दिला जात असल्याचा तक्रारी येत आहेत. निकृष्ट, सडलेला, आरोग्यास हानिकारक असून स्थानिक पातळीवरून होत असलेल्या तक्रारींकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचेच दिसत आहे. या प्रकाराबाबत भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करून खळबळजनक आरोप केला आहे.
www.konkantoday.com