खेड येथील ग्रामीण रुग्णालयासह लोटे येथील घरडा रुग्णालयात प्रत्येकी ३०खाटांची दोन कोविड रुग्णालये सुरू करण्याचा निर्णय
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढत जाणारी संख्या लक्षात घेता शासनाने खेड येथील ग्रामीण रुग्णालयासह लोटे येथील घरडा रुग्णालयात प्रत्येकी ३० खाटांची दोन कोविड रुग्णालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रुग्णालये लवकरच सुरू केली जातील, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सघंमित्रा फुले यांनी दिली आहे.
दापोली, मंडणगड, खेड, चिपळूण येथील कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. या सर्वांना रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले जाते. मात्र, या ठिकाणी मूळातच रुग्ण मोठ्या संख्येने असल्याने प्रशासनासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
www.konkantoday.com