बेकायदेशीर पर्ससीन नेट मासेमारी रोखण्यासाठी सीसीटीव्ही कमेर्यांची यंत्रणा मासेमारी नौकेवर बसविणे बंधनकारक
पराराज्यातील हायस्पिड ट्रॉलर्स तसेच एलईडी दिव्यांद्वारे होणारी बेकायदेशीर पर्ससीन नेट मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाने आणखी एक परिपत्रक जारी केले असून त्यानुसार आता एक ते सहा सिलिंडर मासेमारी नौकांना स्वखर्चातून सीसीटीव्ही कमेर्यांची यंत्रणा मासेमारी नौकेवर बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकृत ट्रॉलिंग व पर्ससीन नौकांबरोबरच एक ते तीन सिलिंडर इंजिनच्या सहायाने गिलनेट प्रकारातील पारंपरिक न्हैय मासेमारी करणार्या बल्यावधारक मच्छीमारांनाही सीसीटीव्ही कमेर्यांचा निर्णय लागू झाला आहे.
www.konkantoday.com