
दहावी परीक्षेचा निकाल या आठवड्यात लागण्याची शक्यता
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे दहावी आणि बारावीचा निकाल उशिराने लागत नाही. एरव्ही बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र यंदा कोरोनामुळे सर्वच निकाल लांबणीवर पडले आहेत.
www.konkantoday.com