चिपळूण तालुक्यातील गणेश खिंडीतील भात शेतात चक्क हत्ती?
चिपळूण तालुक्यातील गणेशखिंड येथील रस्त्याच्या जवळील शेतात हत्ती दिसल्याने लोक अचंबित झाले आहेत. गेले काही दिवस तो हत्ती शेतातच ठाण मांडून आहे. तुम्हालाही आश्चर्य वाटले ना.. खरंतर हा प्रकारच उत्सुकता शिगेला पोहोचवणारा असाच आहे. चिपळुणातील प्रसिद्ध कलाकार संतोष केतकर यांची ही किमया असून त्यांनी आपल्या कौशल्याने शेतात भातपिकाला आकार देत हुबेहुब हत्तीचे चित्र साकारले आहे. भात पिके वाढल्याने नजरेला भुरळ घालणारा नजारा समोर दिसू लागल्याने पंचक्रोशीतून केतकर यांच्या कलाकारीचे विशेष कौतूक होत आहे.
www.konkantoday.com