
चिपळूण आणि खेड तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी गारांचा पाऊस
जिल्ह्यात माेठया प्रमाणात उकाडा वाढला आहे. असे असताना आज सांयकाळी जिल्ह्यात चिपळूण आणि खेड तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. मोठ्या प्रमाणात गारा यावेळी पडल्या. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अनेकांची गडबड उडाली. आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. त्यात उकाडाही वाढली होता अखेर संध्याकाळी काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. चिपळूण तालुक्यातल्या खाडीपट्ट्यात मुसळधार पावसाने वादळीवाऱ्यासह हजेरी लावली
www.konkantoday.com