
कोकणातील चक्रीवादळ ग्रस्तांच्या मदतीसाठी शिवार संसद-सुनंदन लेले यांच्या ‘दिवा लागू दे रे देवा ‘ ह्या कार्यक्रमातून पुढाकार
कोकणात नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक गावांचं अतोनात नुकसान झाले आहे.अनेक घरं उध्वस्त झाली आहेत. कोकणची घडी पुन्हा बसवण्यासाठी काही निधी गोळा करावा लागत आहे.यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे.शिवार संसद- सुनंदन लेले यांच्या पुढाकाराने
मनोरंजनपर कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिकांच्या माध्यमातून काही पैसे गोळा करण्याची एक संकल्पना पुढे आली आहे.याच संकल्पनेतून शिवार संसद-सुनंदन लेले यांच्या ‘दिवा लागू दे रे देवा ‘ हा कार्यक्रम ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आयोजित करण्यात आला आहे.
आपल्या मनोरंजनासाठी या कार्यक्रमांमध्ये नामवंत कलाकार आणि लोकप्रिय क्रिकेटपटू पुढे आले आहेत. ‘दिवा लागू दे रे देवा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून. या कार्यक्रमामध्ये राहुल देशपांडे, डॉ सलील कुलकर्णी, मंजुषा पाटील, सावनी आणि बेला शेंडे , अमर ओक , प्रशांत नासेरी ह्यांच्या सोबत स्वानंद किरकिरे , संदीप खरे आणि वैभव जोशी कविता पण सादर करणार आहेत. ह्यांना चोख उत्तर दिलीप वेंगसरकर, किरण मोरे, केदार जाधव, अजिंक्य राहणे आणि हर्षा भोगले क्रिकेटचे किस्से सांगून देणार आहेत.तसेच आत्ताच्या जमान्याचे अजून दोन महान कलाकार आणि दोन महान खेळाडू पण ह्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत ज्यांची उपस्थिती संयोजकांनी मुद्दाम गुपित ठेवली आहे . संपुर्ण कुटुंबाची अनोखी करमणूक होईल असाच हा कार्यक्रम असणार आहे असे आयोजकांनी सांगितले.
या ऑनलाइन कार्यक्रमासाठी प्रत्येक कुटुबांकडून रु.५,००० च्या देणगी प्रवेशिकेची अपेक्षा आहे. जगाच्या पाठीवर सर्वत्र पोहोचलेल्या आणि देशभरातल्या सर्व मराठी कुटुंबातून ही रक्कम नक्की उभी राहील अशी आशा आहे.
अनिवासी भारतीयांकरिता देणगी देण्याची सोय सोबत दिलेल्या site वर केलेली आहे
https://www.tugoz.com/streams/shivar/diva-lagu-de-re-deva
भारतआतून तिकिट बुकिंगसाठी भेट द्या :
http://shivarsansad.in/shivar_pay/
*कधी : 2 ऑगस्ट रोजी रात्रौ 8 वाजता (ऑनलाइन): तिकीट बुक केल्यावर लिंक शेअर करण्यात येईल.
**आणि कार्यक्रमाची लिंक ४८ तास खुली ठेवण्यात येणार आहे जेणेकरून परदेशात कुठेही राहत असलात तरी तुम्हाला घड्याळाचा विचार न करता कार्यक्रमाचा आनंद घेता येईल
हिच वेळ आहे ती आपल्या कोकणी बांधवांसाठी आपण पुढं यायची!असे आवहान आयोजकांनी केले आहे.
www.konkantoday.com