काेराेना रुग्णाला दाखल करण्यास विरोध करण्याच्या घटना वाढू लागल्या

एखाद्या रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला दाखल करण्यास गेलेल्या आरोग्य पथकांना विरोध करण्याच्या घटना घडत आहे काही दिवसांपूर्वी नाटे येथे रुग्णाला घेण्यास आलेल्या आरोग्य पथकाला विरोध करण्यात आला तसेच त्यांच्या मदतीसाठी गेलेल्या पोलिसांच्या वरही दगडफेक झाली होती आता रत्नागिरी शहरातील पेठकिल्ला पठाणवाडी भागात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला आणण्यासाठी गेलेल्या आरोग्य पथकाला स्थानिक नागरिकांनी रोखले आज आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक रुग्णाला आणण्यासाठी गेले असता तेथील रहिवाशांनी त्याला विरोध केला आम्ही रुग्णाला सिव्हिलमध्ये पाठविणार नाही असे त्यांनी भूमिका घेतली त्यामुळे आता या ठिकाणी पोलीस कुमक मागवण्यात आली आहे असे प्रसंग आले तर आरोग्य कर्मचाऱयांना काम करणे कठीण होऊन बसणार आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button