काेराेनाबाबत जागृता दाखवूनही प्रशासन कारवाई करत नाही -भाजपा नेते व सामाजिक कार्यकर्ते संजय पुनसकर यांचा आरोप
रत्नागिरी जिल्ह्यात काेराेना पसरू नये यासाठी प्रशासनाने अनेक नियमावली केली आहे जनतेनेही या नियमावलीचे पालन करावे अशी अपेक्षा आहे रत्नागिरी शहर परिसरात व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर काेराेना रुग्ण वाढत आहेत असे असूनही प्रशासन मात्र सध्या तटस्थतेच्या भूमिकेत दिसत आहे एखाद्या इमारतीत कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर ती इमारत यापूर्वी सील केली जात होती आरोग्य मंदिर येथील एका इमारतीत कोरोना रुग्ण सापडल्यानंतर ती इमारत सील केली गेली नाही याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते संजय पुनसकर यांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला होता व इमारत सील करण्याची मागणी केली होती परंतु पाठपुरावा करूनही संबंधित यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे ही इमारत सील झाली नाही उलट या इमारतीत आणखी एक रुग्ण सापडला असाच प्रकार पऱ्यांची आळी भागातील इमारती झाला आहे रुग्ण सापडूनही इमारत सील केली जात नाही कोरोना पसरू नये म्हणून जागृतता दाखवून संबंधित यंत्रणेला कळवुनही जर उपाययोजना होत नसेल नागरिकांनी आणखी काय जागरूकता दाखवायची असा सवाल पुनसकर यांनी केला आहे याउलट ग्रामीण भागात कसोप या ठिकाणी काही रुग्ण सापडल्यानंतर त्यापासून पाचशे मीटर लांब असलेल्या वाडीतील लोकांना त्या भागात असलेल्या कारखान्यात कामाला घेतले जात नाही अशी विरुद्ध परिस्थिती आहे तर मुळे कोणताही दोष नसताना या वाडीतील लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी पुनसकर यांनी केली आहे
www.konkantoday.com