
गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीला जोडणार्या पुलांची तत्काळ दुरूस्ती करा
अतिवृष्टी आणि महापुरामुळे गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीला जोडणार्या मार्गावरचे अनेक पूल वाहून गेले आहेत. पिंपळी परिसरातील पूल कमकुवत झाल्याने तो अवजड वाहतुकीसाठी बंद आहे. याचा औद्योगिक वसाहतीतील उद्योग व्यवसायावर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे या पुलाची तात्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी नॉर्थ रत्नागिरी इंडस्ट्रीज असोसिएशनने एका निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली.
www.konkantoday.com