
संगमेश्वर असुर्डे येथे नवविवाहितेची गळफास लावून आत्महत्या
संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे डांगेवाडी येथील साै.स्नेहा प्रसाद पाताडे (२२)या नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली
स्नेहा हिचे प्रसाद पाताडे यांचे बरोबर सात महिन्यांपूर्वी लग्न झाले होते तिच्या नवऱ्याने एक जूलै रोजी वांद्री येथून तिला तिच्या माहेरी म्हणजे असुर्डे डांगेवाडी येथे लोक डाऊन मुळे सोडले होते तेव्हापासून ती माहेरी राहत होती २५जुलै रोजी घरातील सर्व मंडळी नागपंचमीसाठी बाहेर गेली असताना स्नेहा हिने घरातील पडवीच्या भालाला रस्सी बांधून गळफास लावून आत्महत्या केली तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळलेले नाही
www.konkantoday.com