गणेशोत्सवाला गावी येणे, हा चाकरमान्याचा हक्क -राज्यमंत्री अदिती तटकरे
मुंबई-पुणेकर चाकरमानी देखील लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेले आहेत. त्यांची मोठी फरफट झाली आहे. त्यांना गणेशोत्सवाला गावी येणे, हा त्यांचा हक्क आहे. मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या काळात कोणती नियमावली करायची याबाबत शासन आठ दिवसांत निर्णय घेईल, जेणेकरून त्यांना गावी येणे सोयीचे होईल, असे राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
www.konkantoday.com