
राजापूर पोष्ट कार्यालयातील पासपोर्ट कार्यालय कोरोना विषाणु संसर्ग लॉकडाऊनमुळे गेले चार महिने बंद
कोकण विभागातील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांसाठी निर्माण करण्यात आलेले येथील राजापूर पोष्ट कार्यालयातील पासपोर्ट कार्यालय कोरोना विषाणु संसर्ग लॉकडाऊनमुळे गेले चार महिने बंद असल्याने पासपोर्ट काढु इच्छिणाऱ्यांची गैैरसोय निर्माण झाली आहे.
कोकण विभागात रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन नोकरी व्यवसायासाठी परदेशी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र येथील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी मुंबई गाठावी लागत होती.
www.konkantoday.com