
दहावी-बारावीची कॉपीमुक्त परीक्षा! प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेसाठीही भरारी पथके; यंदा सरमिसळ पद्धत
इयत्ता दहावी-बारावीची परीक्षा पारदर्शकपणे पार पडावी, म्हणून यंदा बोर्डाने प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेसाठी भरारी पथके नेमण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीतील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा २ फेब्रुवारीपासून तर लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.दहावीची लेखी परीक्षा १ मार्चपासून सुरू होईल.
जिल्ह्यातील अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून १०० टक्के निकालासाठी परीक्षेवेळी भरारी पथकांचा अंदाज घेऊन वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे सांगितली जातात ही वस्तुस्थिती आहे. अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची खात्री असलेल्या शाळांमध्येच प्रवेश घेतात अशीही स्थिती आहे. त्यासंदर्भातील तक्रारी बोर्डाकडे प्राप्त झाल्यानंतर यंदा पहिल्यांदाच सरमिसळ पद्धत अवलंबण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. त्यामुळे अनेक शाळांची चिंता वाढली आहे.
पण, विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षेची चिंता न करता, प्रश्नांचा सराव व नोट्स काढून त्याच्या अभ्यासावर भर दिल्यास परीक्षा सोपी जाईल, असे शिक्षणतज्ज्ञ सांगतात.
www.konkantoday.com