
रत्नागिरीच्या कोविड रूग्णालयात वाढत्या कोरोना रूग्णांमुळे जागेची समस्या
रत्नागिरी शहरातील कोविड रूग्णालयात रूग्णांची संख्या वाढत असल्याने रूग्णांना उपचारासाठी जागा कमी पडू लागली आहे. आजच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी देखिल उद्यमनगर येथे १०० बेडचे रूग्णालय सुरू करणार असल्याचे जाहीर केले.
सध्या रत्नागिरीच्या कोविड रूग्णालयात ११० वर रूग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोना रूग्णांसाठी आणखी एक वॉर्ड तातडीने सुरू करण्याची तयारी करण्यात आली.
अतिदक्षता विभागात १२ परिचारिका काम करीत असून या सोबत काम करणार्या परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. आरोग्य कर्मचार्यांचे स्वॅब घेण्यात येत असून स्वॅबच्या अहवालाला वेळ लागत आहे. कारण सततच्या कामामुळे या यंत्रणेवरील ताण वाढला असून ४५० ते ५०० अहवाल येणे बाकी असल्याचे कळत आहे.
www.konkantoday.com