जि.प. कर्मचार्यांच्या बदल्यांना १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वर्ग-३, वर्ग-४ मधील कर्मचार्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना सुधारीत शासन निर्णयानुसार १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्य शासनाचा सुधारीत आदेश नुकताच जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. सुधारीत आदेशामुळे कर्मचार्यांच्या बदल्यांसाठी सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेले समुपदेशनाचे वेळापत्रक बदलावे लागणार आहे.
www.konkantoday.com