चिपळूण पोलीस ठाण्यात जखमी गायीच्या उपचारासाठी पोलिसांचा पुढाकार.

चिपळूण पोलीस ठाण्याच्या आवारात फिरणार्‍या जखमी व अशक्त अवस्थेतील एका गायीला चिपळूण पोलिसांनी स्वखर्चातून उपचारासाठी लोटे येथील गोशाळेत पाठवले. एकीकडे कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात व्यस्त असणार्‍या पोलिसांनी दाखवलेले समाजभान सध्या कौतुकास्पद विषय ठरत आहे.बुधवारी चिपळूण पोलीस ठाण्याच्या आवारात ही गाय चरत होती. विशेष म्हणजे गायीच्या पायला मोठी दुखापत झाली असल्याकारणाने जखमी असणारी गाय भुकेमुळे अशक्त झाली होती. या गायीकडे पोलिसांचे लक्ष जाताच तिच्यावर योग्य वेळेत उपचार व्हावेत यासाठी पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे यांनी भगवान कोकरे यांच्याशी संपर्क साधून त्या गायीला लोटे येथील त्यांच्या गोशाळेत घेण्याची विनंती केली. त्यानुसार गायीला एका टेम्पोमध्ये भरून पोलिसांनी गोशाळेत पाठवले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button