सहकारी संस्थाना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला
राज्यात कोविड-१९ चे संकट असल्याने सहकारी संस्थाना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सहकारी संस्था लेखा परीक्षण, वार्षिक सर्वसाधारण सभेचा कालावधीत वाढ करण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता लेखा परीक्षण अहवाल डिसेंबर २०२० आणि वार्षिक सर्वसाधारण सभा मार्च २०२१ पर्यंत घेण्यास मुदतवाढ मिळाली आहे.
www.konkantoday.com