शैलेंद्र रिसबूड यांचा संकल्प सुफळ, संपूर्ण १५ मिनिटे, ५७ सेकंद आणि १६४ जोर मारुन लोकमान्य टिळक यांना मानवंदना

‘स्वराज्य उपक्रम -१४’ अंतर्गत डोंबिवलीकर लोकमान्य टिळक प्रेमी आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करणारे शैलेंद्र रिसबूड यांनी १६ मिनिटे ४० सेकंदात – १६४ जोर हा उपक्रम करण्याचा संकल्प केला होता. रिसबूड यांचा हा उपक्रम सुफळ संपूर्ण झाला आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १६४ वी जयंती (तारखेनुसार) २३ जुलै २०२० रोजी होती. यानिमित्ताने रिसबूड यांनी लोकमान्य टिळक यांना ही आगळी मानवंदना दिली.
गुरुवार दिनांक २३ जुलै २०२० रोजी सायंकाळी ५.३० वाजता रिसबूड यांनी आपल्या निवासस्थानी १५ मिनिटे, ५७ सेकंद आणि ५२ मिलीसेकंदात १६४ जोर मारण्याचा संकल्प पूर्ण केला.
गेल्या वर्षी १ ऑगस्ट २०१९ या दिवशी लोकमान्य टिळक यांचे शताब्दी पुण्यस्मरण वर्ष सुरु झाले. लोकमान्य टिळक यांच्या ९९ व्या पुण्यतिथीनिमित्त रिसबूड यांनी शंभर सूर्य नमस्कार घालून टिळक यांना आदरांजली वाहिली होती. लोकमान्य टिळक यांनी अखेरचा श्वास मुंबईतील ज्या सरदार गृहात घेतला त्या ठिकाणी रिसबूड यांनी हा उपक्रम केला होता.
लोकमान्य टिळक यांनी मुंबईत केशवजी नाईकांच्या चाळीत मुंबईतील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. या घटनेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रिसबुड यांनी लोकमान्यांना १, ५०० सूर्य नमस्कारांची मानवंदना दिली होती. २५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या गणेशोत्सव कालावधीत दररोज १२५ सूर्य नमस्कार त्यांनी घातले होते. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या लोकमान्यांच्या सिंहगर्जनेला शंभर वर्षे पूर्ण झाली तेव्हाही रिसबुड यांनी ३०० सूर्य नमस्कारांचा उपक्रम सादर केला होता. एका दिवसात सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी १५० सूर्य नमस्कार त्यांनी घातले होते.
तरुणांमध्ये देशी व्यायामाचे महत्व रुजवावे, या उद्देशाने आपण हे उपक्रम करत असल्याचे रिसबुड यांनी सांगितले.
‘लोकमान्य’ चित्रपटात लोकमान्य टिळक यांची भूमिका करणारे अभिनेते सुबोध भावे यांनी ‘स्वराज्य उपक्रम -१४’ या उपक्रमासाठी रिसबूड यांचे खास अभिनंदन केले आहे. भावे यांनी
Instragram वर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button