
राज्यात काल ६४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले
राज्यात काल ६४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ९४ हजार २५३ झाली आहे. दरम्यान, काल कोरोनाच्या ९८९५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४० हजार ०९२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
www.konkantoday.com