
रत्नागिरी जिल्ह्यातील ४६ महिलांनी करोना लॉकडाउनच्या काळात वन स्टॉप सेंटर योजनेचा लाभ घेतला
केंद्र शासनाच्या वन स्टॉप सेंटर योजनेअंतर्गत लॉकडाउन कालावधीमध्ये कौटुंबिक हिंसाचाराने पीडित महिला तसेच बालकांसाठी वन स्टॉप सेंटरच्या दूरध्वनीवरून तत्काळ कायदेविषयक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ४६ महिलांनी करोना लॉकडाउनच्या काळात या सेवेचा लाभ घेतला आहे.
वन स्टॉप सेंटरमुळे कौटुंबिक हिंसाचारापासून पीडित महिलेला स्वतंत्र दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून कायदेविषयक सल्ला, मदत आणि समुपदेशन देण्याचे प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले आहे. तेथून विधी सेवा प्राधिकरणातर्फे नेमलेल्या वकिलांमार्फत कायदेविषयक मदत, सल्ला, न्यायालयात दाद मागण्यासाठी तरतूद ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
www.konkantoday.com