युजीसीच्या निर्णयाला विरोध करणारे शासन सीईटीच्या परीक्षांना मात्र पुढील तारखा देत आहे -माजी आ. डॉ. विनय नातू
मुलांच्या शैक्षणिक व भवितव्याच्या दृष्टीने पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला अनन्य साधारण महत्व असते. मात्र राजभवनात कोरोनाचा शिरकाव व कर्नाटक राज्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कोरोनाची लागण अशी कारणे देत महाराष्ट्रात अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षा नको असा जोरदार हट्ट महाराष्ट्राच्या आघाडी सरकारकडून केला जात आहे. युजीसीच्या निर्णयाविरोधात युवा सेना सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. असे असताना महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण खाते सांभाळणारे डॉक्टर मंत्री सीईटीच्या परीक्षांना मात्र पुढील तारखा देत आहेत. खरोखरच मंत्री एक निर्णय अनेक, उद्धवा गजब तुझे सरकार अशा शब्दात भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी ना. उदय सामंत यांच्यावर टीका केली आहे.
www.konkantoday.com